एकदा एका गावात एक कोळसेविक्या नवीन जागी दुकान टाकतो. त्याच्या
शेजारीच चिकटूनच एका परीटाच दुकान असत.
साहजिकच शेजारी असल्याने आणि पोटासाठी धंदा
करणाऱ्या त्या दोघांची दोस्ती होते. कामानिमित्त त्या दोघांनापण बाहेरगावी जाव
लागे.
चांगली मैत्री झाल्यावर एके दिवशी कोळसेविक्या परिटाला म्हणतो,
"मित्रा, आपण दोघेपण बाजारहाटासाठी बाहेरगावी जातो त्यात खर्च तर होतोच पण
एकट जायला-यायला कंटाळवाण पण वाटत, जर आपण एकत्र गेलो तर पैशांची पण बचत होईल आणि
वेळ पण छान जाईल."
त्यावर परीट म्हणतो,
"तू म्हणतोस ते खर आहे मित्रा पण आपल कामाच स्वरूप काही अस करायला योग्य आहे
अस मला वाटत नाही आणि मला वाटत झाली तितकी दोस्ती बस झाली आता आपण दूर राहिलेलच
बर."
परीटाने काही दिवसात ती
जागा सोडून नव्या जागी बस्तान हलवले.
- इसापनीती
No comments:
Post a Comment