गुऱ्या,
काय लिहू कळत नाही..... काहीही लिहायला बसल कि
माझी हि सुरवात ठरलेलीच आहे अस वाटायला लागलंय आता.. सगळा पांचटपणा..
अस वाटतंय संपल माझ सगळ बोलून. हे मराठी टायपिंग
मस्त आहे, आधी पण वापरलं होत पण विंडोज सेवन मध्ये जास्त फ्रेंडली वाटतंय. असला
काहीतरी शोध तुम्ही लावायला पाहिजे होता.
आजपण खूप बोर होत आहे, नेहमीचच झालंय तस... अस
लिहायला पण ऑड वाटतंय यार, पेपर घाण करायची मजा वेगळीच असते, इथ कस सगळ सुटसुटीत,
मोकळ, स्वच्छ, खोट-खोट.... पेपर मस्त असतो, तो मला माझा वाटतो, जवळचा...माझ्या
लाइफ सारखा...कॉम्प्लिकेटेड..आडव्या-तिडव्या रेघोट्या मारता येतात, हवी तिथ हवी
तशी गिचमिड करता येते, एकदा शाई उमटली कि झाल, परत माघार नाही, तिला घेऊनच पुढ जाव
लागत. शेवटी जे उरणार आहे जे निर्माण होणार आहे त्याचा ती प्रत्येक गोष्ट भाग
असते,चांगलीपण वाईटपण... तसच आपल्या आयुष्याच पण आहे न, एकदा गोष्ट घडली कि घडली
परत माघार नाही.. वेळ एकदाच येते. त्यात जे होईल ते होईल.. पुढ त्यासोबतच जगाव
लागत, खोडरबर नाही ना डिलीट च बटन नाही...रिस्टार्ट तर मुळीच नाही. म्हणून मला
पेपर वर पण पेन्सिल आवडते, पण जीवनासोबत ती कधी वापरता आलीच नाही. पण कदाचित
त्यामुळंच आयुष्यात मजा असेल.
मॅचुरीटी कधी येईल का रे माझ्यात... का मी असाच
आहे आणि असाच असण्यासाठी मी असा आहे? पण मुळात मी का आहे हेच कळत नाहीये मग असा का
तसा का काय फरक पडतो, बघायला गेल तर जवाबदारया खूप आहेतच कि, पण कुठ काय गफला
होतोय समजत नाहीये. काहीच व्यवस्थित आहे अस वाटत नाहीये. नाहीच आहे....
हे सगल इल्युजन असाव...मला खूप बर वाटेल.
माझ्यात काही स्पिरीट राहीलच नाही अस झालंय, कशात
काही अॅम्बिशण राहिलीच नाही, रस राहिला नाही... उगी ढकलत चाललोय स्वतःला.
प्रोब्लेम आले फेस करतोच आहे, हातपाय गाळून बसत नाही अजून, पण काहीतरी कमी आहे,
खूप महत्वाच काहीतरी मिसिंग आहे आता....
झोपलो आता...झोपून टाईप करतो. बट काय बोलू नाही
कळत ए...
आतापर्यंत काहीतरी सेटलमेंट, काहीतरी अचिव्हमेंट
पाहिजे होती यार सगळच फिस्कटलय... मोठ्या उमेदीने आलो होतो स्पर्धा परीक्षेची
तयारी करायला, स्वतःला बदलायचं होत जग बदलण्यासाठी....सगळच फिस्कटल आता. वेळ आहे
अजून पण उमेद नाही ती आता... वाटत कधीकधी सगळ सोडून निघून याव तुमच्याकड पण काय
माहित तिथ येऊन पण काय विचार करेन मी आणि काय मिळवेल काय गमावेल. आणि असहि वाटत न
कि सोपा पर्याय तर कुणीही निवडेल, पळून जाण तर सोपच आहे, आणि मी स्वतःला-स्वताच्या
परिस्थितीला पाठ दाखवून पळालो तर ती जाणीव घेऊन मी निट राहू शकेल का? इकडे काही
करू शकलो नाही म्हणून तुझ्या आश्रयाला आलो हि जाणीव घेऊन मी जगू शकत नाही. मला इथच
शिकाव लागेल, मी इथ चुकतोय मला इथच सुधाराव लागेल. ते म्हणतात न जे जीथ हरवलं ते
तिथच शोधाव लागत.
अस वाटतंय पूर्ण आयुष्य जगलोय मी, काही राहील
नाही. ध्येय नसलेल आयुष्य मलाच कधी पटल नाही, ते कधी माझ्या वाट्याला येईल अस वाटल
पण नाही. पण आहे....आता.
आई गेली, पण खूप काही देऊन खूप काही शिकवून गेली
ती, अखेरच्या काळातही खूप काही दिलं तिने ते मी कस वाया जाऊ देऊ.... तिने
विश्वासाने ज्या गोष्टी मला शिकवल्या त्या सोडून कशा देऊ? हरन तिने कधीच शिकवलं
नाही, मृत्यू समोर असताना ती कधी मनाने हरली नाही, त्याही परिस्थितीत तिने जिवनाच
खूप मोलाचं तत्वज्ञान मला दाखऊन दिल. मला तो वारसा पुढ न्यायचाय.
मी.....
नक्कीच अस म्हणणार नाही कि खचून जाण्याच्या सगळ्या पायऱ्या मी उतरलोय, त्या
नशीबाला म्हणा तुला अजून खूप झटाव लागेल मला तितक् खाली खेचायला आणि तरी तू
जिंकशीलच अस नाही. मी इतका सोपा नाही जिंकायला. आहे अजून डोक जागेवर माझ,थोड भटकतय
इतकच.
काय सांगू गुऱ्या (मी खूप खुश झालो होतो जेव्हा
हे गुऱ्या जी यु आर वाय ऐ टायीप केल कि हव तस प्रिंट झालेलं पाहून)
माझ्या डोक्यात इतका कचरा झालाय ना कि कामाच्या
गोष्टी काढून मी त्यावर लक्ष केंद्रित नाही करू शकत आहे, कामाची गोष्ट बाहेर काढली
ना कि ती या कचरयानि बरबटलेलीच असते. बळजबरी मी मनावर ना कधी करू शकलोय ना अजूनही
करू शकेल अस वाटतंय. मनाविरुद्ध नाही वागता येत मला, आणि जर वागलोच तर त्याचा
उपयोग होत नाही, फक्त वेळ वाया गेलेला असतो मग. पूर्ण तयारीने, पूर्ण ताकद लावून
नाही रे मी अजून या परीक्षा देऊ शकलो, नेहमी काहीतरी कारण आहेच, या कारणांना मीच
कंटाळलोय. ज्या ताकदीने ज्या उमेदीने आपण सोबत असताना काही गोष्टी करायचो, तहान-भूक
विसरून फक्त त्याच गोष्टीचा ध्यास असायचा, झोपेत जागेपणी तेच विचार, काम कस तडीस
नेता येयील, कस ते परिपूर्ण राहील... तस मी अजूनही नाही स्वतःला पाहू शकलो
इकडे...त्याच्या अर्धदेखील नाही. तो वेडेपणा कुठ हरवलाय कि.... खूप गरज आहे
त्याची.
विचार करून, सल्ले घेऊन, प्लान करून हाती काही
लागत नाहीये, फिझीकल सिग्निफिकंस असलेल एखाद माझ बटन हरवलय आणि तेच प्रेस करायची
गरज आहे.. इतर काहीही वर्क नाही करत आहे.
पण मी करणार आहे, मला माहित नाही कस ते, पण मी
मधेच सोडणार नाही.... वेळ लागेल कदाचित, पण मला माझा मार्ग स्वतालाच काढावा लागेल.
माझा कागद चुकांनी कितीजरी भरून गेला तरी त्या रेघोट्याना पुढ नेवून त्यापासूनच एक
छानस चित्र मला उभ करायचय. आज दिसत नसल तरी ते त्या चुकांमधेच लपलेल असाव......
मी
परत सुरवात करतोय....
मला अजून बोलाव वाटतंय पण काय ते नाही सुचत, सो
थांबतो....